OBC, VJ, NT, SBC विद्यार्थ्यांसाठी योजना jee neet
टॅब, 6GB डेटा कोचिंग प्लान jee neet
महाराष्ट्र सरकार मोफत ऑनलाइन JEE कोचिंग दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंददायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती संस्थेच्या माध्यमातून JEE NEET, आणि MHT-CET परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, दररोज 6 GB इंटरनेट डेटा आणि दर्जेदार मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
योजना कोणासाठी आहे?
या योजनेचा लाभ इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT), विशेष मागास वर्ग (SBC) मधील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इच्छुक विद्यार्थी 2025 मध्ये दहावी उत्तीर्ण झालेले असावेत आणि त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, हे अनिवार्य आहे.
अर्ज कसा करायचा?
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२५ आहे.
ऑनलाईन अर्जाची लिंक: [mahajyoti.org](https://mahajyoti.org) (साइटवर मोबाईल नंबरद्वारे OTP पडताळणी करून फॉर्म भरायचा आहे)
महाराष्ट्र सरकार मोफत ऑनलाइन JEE कोचिंग
लागणारी कागदपत्रे:
1. आधार कार्ड (दोन्ही बाजू)
2. डोमिसाईल सर्टिफिकेट (राहिवासी प्रमाणपत्र)
3. जातीचा दाखला (Caste Certificate)
4. नॉन-क्रिमिलियर सर्टिफिकेट (जर लागु असेल तर)
5. 10वी मार्कशीट
6. 11वी प्रवेशाची पावती / बोनाफाईड सर्टिफिकेट
7. अपंग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल)
8. पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी (200KB पेक्षा कमी JPG/JPEG स्वरूपात)
फॉर्म भरताना आवश्यक माहिती:
अर्जदाराचे पूर्ण नाव, पालकांचे नाव
लिंग, जन्मतारीख, कास्ट आणि कॅटेगिरी
निवडलेली परीक्षा (JEE / NEET / MHT-CET)
शाळेची माहिती, बोर्ड, टक्केवारी
सध्याचा व कायमचा पत्ता
महत्त्वाच्या सूचना:
कोणत्याही चुकीच्या माहितीस पात्रता रद्द केली जाईल.
अर्ज पोस्ट किंवा ईमेलने स्वीकारले जाणार नाहीत.
अर्जासंबंधी अडचण असल्यास संस्थेचा हेल्पलाईन नंबर वापरावा.
शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश:
या योजनेचा मुख्य उद्देश मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.
विद्यार्थी व पालकांसाठी आवाहन:
ही योजना अत्यंत उपयुक्त असून, जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. आपले भविष्य उज्ज्वल करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे!
शेवटची तारीख: ३१ मे २०२५
अधिक माहिती व अर्ज: [mahajyoti.org](https://mahajyoti.org)
0 Comments