लाडकी बहिण योजना मुदत किती आहेत?:लाडक्या बहिणीसाठी शेवटची संधी!

 लाडकी बहिण योजना मुदत किती आहेत?

सध्या लाडकी बहीण जोरात चालत आहे. आतापर्यंत सरकारने लाडक्या बहिनिसाठी 3 हापत्यामध्ये 7500 रुपये जमा केले आहेत. या पैशामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. अगदी गेल्या दोन तीन महिन्यांमध्ये महिलांना या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनवलं आहे.

लाडकी बहिण योजना मुदत किती आहेत



 विशेष गरीब महिलांना या योजनेचा विशेष फायदा झाला आहे. म्हणजे काही महिलांनी या पैशाच्या जोरावर अगदी छोटा मोठा उद्योग सुरू करून स्वावलंबी बनल्या आहेत. याचा अर्थ सरकारने श्रीमंत महिलांना पैसे दिले नाही असं नाही. श्रीमंत महिलांना सुध्दा तेवढेच पैसे सरकारने दिले आहेत. 

 

योजनेची व्याप्ती 

Ladki bahin yojana


लाडकी बहिण योजना ही सध्या पूर्ण महाराष्ट्र सुरू आहे. अगदी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये ही योजना सरसकट लागू केलेली आहे. 

आणि या योजनेमध्ये पुढे अजून रक्कमेचा हप्ता वाढवण्याचा सरकारचा मानस आहे.त्यामुळे या योजनेला अजून मोठे स्वरूप मिळणार आहे.

विशेष म्हणजे या योजनेमध्ये बदल करून होतकरू महिलांना पैसे आणि सोबतच उद्योग धंद्यांना सहकार्य करण्याचा सारकरचा मानस असल्याचे सांगितले जाते आहे.



लाडकी बहिण योजनेला मुदतवाढ

जसे की आपण पाहिले आहे की जवळपास राज्यातील सर्वच महिलांना या योजनेचा फायदा मिळाला आहे. आणि काही महिलांचा बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे पैसे तर आलेत पण kyc मुळे किंवा आधार लिंक नसल्यामुळे पैसे अद्याप त्यांना मिळाले नाहीत. 

परंतु पैसे हे अकाउंट ला जमा तर झाले तर आहेत. त्यामुळे पैसे आज किंवा उद्या मिळणारच आहेत. त्यामुळे या महिलांनी टेन्शन घेण्याचं गरज नाही.

अद्याप ज्या महिलांनी फॉर्म च भरलेला नाही अशा महिलांनी सुधा घाबरण्याची गरज नाही. सरकारच्या निदर्शनास आले आहे की अद्याप काही महिलांनी फॉर्म भरलेला नाही किंवा आतापर्यंत एकही हप्त्याची रक्कम घेतलेली नाही. 

कारण काही महिला खेड्यापाड्यात राहतात. त्यांना अशा योजनेची माहिती मिळत नसते. व त्या महिला अशा योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरकारने अशा महिलांनाही योजनेचा लाभ घेता यावा म्हणून या योजनेमध्ये 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे

त्यामुळे ज्या ज्या महिलांना अजून फॉर्म भरला नाही अशा महिला 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरू शकतात. व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.



आता फॉर्म भरणाऱ्या महिलांना किती पैसे मिळणार

  • आता फॉर्म भरणाऱ्या महिलांना पैसे किती मिळणार हा प्रश्न सर्व पडला आहे. 
  • कारण आता पर्यंत 3 हप्त्यामध्ये मिळून एकूण 7500 रुपये पहिल्या महिलांना मिळाले आहेत. तर 7500 च आता फॉर्म भरणाऱ्या महिलांना मिळणार का?
  • तर हो. आता फॉर्म जरी भरला तरी एकूण 7500 रुपये एकदम महिलांना मिळणार आहेत.
  • विशेष म्हणजे या महिलांना दिवाळीचा बोनस धरून पैसे मिळणार आहेत. त्यामुळे 
  • ज्या ज्या महिलांनी अद्याप फॉर्म भरलेला नाही अशा महिलांनी 15 ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.



आधार लिंक स्टेटस कसे चेक करवे?

Adhar link status


  1. ज्या ज्या महिलांना आधार लिंक नसल्यामुळे पैसे आलेले नाहीत अशा महिलांनी घरी बसल्या आपल्या मोबाईल वरुन आधार आपल्या बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करता येईल.
  2. त्यासाठी सर्वप्रथम आधार च्या ऑफिशियल वेबसाईट ल भेट द्यायची आहे. 
  3. ऑफिसियाल वेबसाईट ल गेल्यावर आपला आधार नंबर टाकून आनी कॅपचा टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
  4. सबमिट बटन वर क्लिक केल्यावर आपल्या आधार रजिस्टर नंबर ल otp येईल. तो otp वेबसाईट ल टाकल्यावर आपण आधार ल लॉगिन होतो.
  5. लॉगिन झाल्यावर आधार चे सर्व मेनू दिसतील.
  6. त्या सर्व मेनुपैकी adhar bank seeding status ल क्लिक करायचे आहे.
  7. या ऑप्शन ल क्लिक केल्यावर आपल्याला आपली आधार नंबर ज्या ही बँकेत लिंक असेल त्या बँकेचे नाव येते. आणि bank seeding status active असा मेसेज दाखवते.
  8. आणि जर का आधार लिंक नसेल तर adhar seedimg status not active असा मेसेज दाखवते.



Adhar Seeding कसे करावे?

  • आधार बँकेला सीडींग करणे सुधा अगदी  सोपे आहे. आपण घरी बसल्या आपल्या मोबाईल वरुन आधार बँकेला लिंक करू शकता.
  • यासाठी सर्वप्रथम NPCI या ऑफिसियल वेबसाईट ल भेट द्यायची आहे. 
  • ऑफिसियल वेबसाईट ल भेट दिल्यानंतर वरच्या लाईन मध्ये एका सरळ लाईन मध्ये मेनू दिसतील. 
  • त्यापैकी consumer या मेणुवर केल्यानंतर पुढचा मेनू म्हणजे Bharat Adhar Seeding  Enable हा ऑप्शन दिसेल. मग या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • Adhar Seeding Enable या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर पुढे एक फॉर्म ओपन होईल. ज्यामध्ये आधार नंबर एंटर करायचा असेल. त्यानंतर seeding या पोप मेनू ल क्लिक करायचे आहे.

  • त्याच्याच खाली बँकेचे लिस्ट दिसेल. यामधून आपली जी कोणती बँक असेल ती बँक सिलेक्ट करायची आहे. 
  • आणि मग खाली जी बँक सिलेक्ट केली आहे त्या बँकेचा अकाउंट नंबर एंटर करायचा आहे.
  • हा अकाउंट नंबर दोन वेळेस एंटर करायचा आहे.
  • त्याच्याच खाली कॅपचा एंटर करून Proceed या बटन वर क्लिक करायचे आहे.
  •   Proceed बटन वर क्लिक केल्यावर bank seeding साठी आपली रिक्वेस्ट घेतली जाईल. व नेक्स्ट 2-3 दिवसामध्ये आधार सीडिंग होऊन जाईल.
  • आणि मग हे Adhar seeding झाले का नाही हे पाहण्यासाठी परत आधार UIDI या ऑफिशियाल वेबसाईट वर जाऊन चेक करायचे आहे.



हेही वाचा.....


Post a Comment

0 Comments