जाणून घ्या महिलांच्या खात्यात पैसे का थांबले
Ladki Bahin Yojana Big News In Marathiमहाराष्ट्रातील लोकप्रिय योजना, मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना, आता काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील हप्ते कधी मिळतील आणि योजना पुन्हा सुरू होईल का याबाबत संपूर्ण माहिती आपण पाहूया.
योजना बंदीमागील कारण:
राज्यात आगामी विधानसभा निवडणुका होत असल्याने, निवडणूक आयोगाने मतदारांवर आर्थिक लाभाच्या योजना तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सध्या थांबवण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व प्रशासकीय विभागांना तशा सूचना दिल्या आहेत.
10 लाख महिलांना मिळणार नाहीत हप्ते:
महायुती सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत 2 कोटी 34 लाख महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते जमा केले आहेत. मात्र, 10 लाख महिलांच्या खात्यात अजून हप्ते जमा झाले नाहीत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.पुढील हप्ते कधी मिळतील?
महिलांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो की, योजना कायमची थांबवली गेली आहे का? असं काही नाही. सरकारने नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आधीच 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित महिलांना निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर उर्वरित हप्ते दिले जातील आणि योजना पुन्हा सुरू होईल.
0 Comments