हाउसफुल 5 चा टीझर रिलीज अक्षय नाना एकत्र हनी सिंगचं गाणं आणि किलर कॉमेडीचा डोस!

 

हसण्याचा पुन्हा स्फोट! 'हाउसफुल 5' ची अधिकृत घोषणा, जून २०२५ ला होणार भव्य प्रदर्शित!Housefull 5 release date Marathi

 

Houseful 5

भारताची सर्वात मोठी कॉमेडी फ्रँचायझी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे! Housefull 5 release date Marathi चा अधिकृत टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. यंदाची भागात हास्य तर आहेच, पण या वेळी 'किलर कॉमेडी'चा धमाका पाहायला मिळणार आहे!

१५ वर्षांपूर्वी सुरू झालेला हसण्याचा हा झंझावात आता ५व्या भागात दाखल झाला आहे.


 स्टारकास्ट जबरदस्त, हसवणार दमदार!

 या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुपरहिट तिकडी , अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि chunky पांडे – एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यांच्यासोबत यावेळी अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, चित्रांगदा सिंग, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, फर्दिन खान, श्रेयस तळपदे, जॉनी लिव्हर, डिनो मोर्या, रंजीत आणि इतर अनेक तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच या चित्रपटामध्ये हास्याचे कल्लोळ पहायला मिळणार आहेत.


 

 निर्मिती आणि दिग्दर्शन

या चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियादवाला आहेत. आणि दिग्दर्शनाची जिम्मेदारी श्री. तरुण मनसुखानी यांनी केले आहे. कथा आणि पटकथा स्वतः साजिद नाडियादवालानी लिहिलेली आहे. त्यामुळे कॉमेडी आणि दिग्दर्शना मध्ये ही एक मोठा अनुभव पहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच याचा फायदा हा सिनेमा सुपर डूपर होण्यासाठी होणार आहे.


 संगीत आणि धमाल गाणी

चित्रपटातील पाहिल गाण हे ‘लाल परी‘ आहे. जे की हनी सिंह आणि समर कौर यांनी संगीत बद्ध करून गायले आहे. खूप दिवसापासून हनी सिंह याचे कुठले ही गाणे आणि म्युझिक मार्केट मध्ये आले नव्हते. त्यामुळे लोकांच्या खूप दिवसाच्या आतुरतेनंतर हनी सिंग याचे गाणे 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांना ऐकायला व पाह्यला मिळणार आहे. तसेच या गाण्याचे बोल अल्फाज आणि हनी सिंह याचे. आणि हे कॉम्बिनेशन संगीत प्रेमींना ही आवडेल अशी अपेक्षा आहे.

 

  जून २०२५थिएटरमध्ये हशांचा स्फोट!

हाउसफुल 5’  जून २०२५ रोजी भारतभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, या भागात अक्षय कुमार आणि नाना पाटेकर एकत्र येणार असल्याने, विनोदाची मेजवानी ठरणार हे नक्की!आपल्याला माहितच आहे की, नाना पाटेकर यांनी खूप कमी कॉमेडी चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु जेवढ्याही चित्रपटात काम केले ते सिनेमे सुपर डूपर झालेले आहेत. जसे की वेलकम सिनेमा आणि वेलकम सिनेमाचे सर्व भाग ही सुपर सुपर डूपर आहेत. असे अजून खूप सिनेमा आहेत ज्यामध्ये नाना पाटेकर यांनी काम केल्यामुळे सुपर हिट आहेत.

त्यामुळे या चित्रपटामध्ये ही नाना पाटेकर यांचा सहभाग असल्या कारणाने सिनेमा हिट होण्यामध्ये  शाश्वती मिळत आहे.


 

प्रेक्षक म्हणतात:

प्रेक्षकाच्या मते Housefull 5 release date Marathi सिनेमा हा हसण्याचा महा कल्ला आहे. त्यामध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि चंकी पांडे हे या सिनेमा मध्ये एकत्र असल्यामुळे ट्रिपल कॉमेडीचा महा एपिसोड ठरणार आहे. त्यातच हनी सिंग आणि अक्षय कुमार यांच्या कॉम्बिनेशन विषयी पण चर्चा होत आहे. कारण हनी सिंग आणि अक्षय कुमार हे पहिल्यांदाच एकत्र असल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे.

 तर तयार राहा... कारण हसण्याचा जबरदस्त डोस पुन्हा एकदा येतो आहेहाउसफुल स्टाईलने!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now


Also Read ...

हेरा फेरी 3' मधून परेश रावल बाहेर? अक्षय कुमारने पाठवली 25 कोटींची नोटीस! अक्षय-परेश यांच्यात जोरदार संघर्ष! फॅन्स संतप्त!

Post a Comment

0 Comments