लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? नावात त्रुटी असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही!

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे कानावात त्रुटी असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही!


 

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे कामहाराष्ट्रभर सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना वगळण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नुकतीच यासंदर्भात माहिती माध्यमांशी शेअर केली आहे. 

 

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?

लाडकी बहीण योजनेतून महिलांना वगळण्याची प्रक्रिया सुरू

 

या योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व महिलांना सरसकट लाभ दिला जात होता. मात्र, निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सरकारने योजनेतील त्रुटी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. 

 

चारचाकी वाहन असलेल्या महिलांना वगळण्याचा निर्णय

विशेषतः चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ते १० लाख महिलांना लाभापासून वंचित करण्यात आले आहे. 

 

लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का?

नावात त्रुटी असल्यास मिळणार नाही लाभ

योजनेतून महिलांना वगळण्याची प्रक्रिया येथेच थांबलेली नाही. ज्या महिलांच्या नावात बदल किंवा काही त्रुटी आढळतील, त्यांना देखील योजनेतून वगळले जाईल.त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी पसरत आहे. 

 

महिलांचा सरकारवर रोष

महिलांच्या मते, निवडणुकीपूर्वी सर्व महिलांना लाभ देण्यात आला, मात्र निवडणुकीनंतर सरकारने नाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे महिलांकडून सरकारला प्रश्न विचारले जात आहेत – ”आम्हाला आधी लाभ मिळाला, पण आता का बंद केला जातोय?”

 

सरकारच्या निर्णयावर महिलांचे प्रश्न 

महिलांना वाटते की, सरकार हेतूपुरस्सर काही लाभार्थींना वगळत आहे. त्यामुळे महिलांमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढत आहे. यावर सरकार पुढे काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


Post a Comment

0 Comments