आता या रेशनकार्ड धरकानाच मिळणार आनंदाचा शिधा, या ४ वस्तू मिळणार फक्त १०० रुपयात

 आता या रेशनकार्ड धरकानाच मिळणार आनंदाचा शिधा

अन्न पुरवठा महामंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या आनंदाचा शिधेचा तपशील पाहता अगदी आनंदाची बातमी म्हणता येईल.






 कारण आता रेशनकार्ड धारकांना राज्य सरकार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंदाचा शिधा ही योजना गणेश चतुर्थी च्या पूर्वसंध्येला सुरू केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


 या आनंदाचा शिधा योजने अंतर्गत तब्बल चार प्रकारचे रेशन देण्यात येत आहे. त्यामधे चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा चार प्रकारचे रेशन अवघ्या 100 रुपयात देण्यात येत आहे.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी योजनेचा सपाटा लावला आहे. अगोदरच लाडकी बहीण योजना सुरू असताना अजून आनंदाचा शिधा ही योजना आली आहे. आणि ही योजना केवळ 100 रुपयात 4 रेशन वस्तू अशी असणार आहे.


  1. योजनेत मिळणारे रेशन
  2. चना डाळ 1kg 
  3. तेल 1ltr 
  4. साखर 1kg 
  5. रवा 1kg 


ही योजना अंत्योदय अन्न योजना या योजने अंतर्गत देण्यात येत आहे.( AAY). महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम (NFSA) अंतर्गत रेशन कार्ड धारकांना देण्यात येत आहे.





गणेश चतुर्थीच्या सुरुवातीला सुरू केली कारणाने लोकांमध्ये आनंद आहे. कारण एवढ्या महागाईच्या काळात अशा प्रकारची योजना ही लोकांसाठी वरदान ठरत आहे. खास करून खेडेगावातील गरीब लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी या योजनेचा उपयोग होत आहे.

  



सदरील योजना ही काही विशेष विभागासाठी लागू आहे.

  • छत्रपती संभाजी नगर विभाग
  • अमरावती विभाग
  • नागपूर विभाग

 आणि शेतकरी आत्महत्या ग्रस्त 14 जिल्हे अशा भागात सुरू केलेली आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यामध्ये पण ही योजना लावरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.


कुठल्याही सणाच्या निमित्ताने अशा योजना सुरू होत असतात. त्यापैकी ही एक योजना अत्यंत गरजेच्या वेळी सुरू केली गेली आहे. कारण या योजना सहसा दिवाळी च्या वेळी सुरू केल्या जातात. परंतु या वेळेस चतुर्थी च्या वेळी सुरू केली गेली आहे.

Post a Comment

0 Comments